पहिला “गौरव पुरस्कार” सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न.

मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम (Marathimovieworld.com) या संकेतस्थळाच्यावतीने देण्यात येणारा पहिला “गौरव पुरस्कार” सोहळा १० जानेवारी रोजी रवींद्र नाट्य मंदीर, प्रभादेवी मुंबई येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

मराठी रसिकांची लाडकी अभिनेत्री सई रानडे-साने हिने आपल्या प्रभावी आणि विनम्र शैलीत ह्या पुरस्कार सोहळ्याचे निवेंदन केले.

मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम गौरव पुरस्कारात सर्वोत्कृष्ट सिनेमा, नाटक, मालिका, नायक, नायिका असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय प्रथमच मराठी चित्रपटस्रुष्टीतील ”प्रदर्शन पूर्व बहुचर्चित चित्रपट” हा एक नवीन विशेष पुरस्कार देण्यात आला, या पुरस्कारासाठी पहिल्या वर्षाचामान मिळाला तो ‘शाळा’ ह्या चित्रपटास. पुरस्कार वितारणादरम्यान विविध रंगतदार आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. त्यात मराठी लावणीनृत्य, लोकगीते, त्याच बरोबर गाजलेल्या मराठी गीतांवरील नृत्य सादरीकरणाचा समावेश होता. विशेष दाद मिळाली ती छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर आधारित असलेल्या सादरीकरणाला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन “मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम” चे संस्थापक श्री. आर. डी. मोरे, श्री जितेंद्र मोरे, सिनिअर पत्रकार उल्हास शिर्के आणि कलाकारांच्या वतीने मृण्मयी देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. मनोरंजन विश्वातील संपूर्ण माहिती बरोबरच विविध, नवीन, कल्पक सदरांद्वारे “मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम” हे संकेतस्थळ जगभरातील मराठी रसिक आणि मराठी मनोरंजन विश्वाला जोडणारा एक दुवा ठरणार आहे .
'Gaurav Purskar'
click here to read more

Advertisements

Leave a comment

Filed under News

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s