प्रशांत दामलेच्या गायनाने सरेगमपचा मंच झाला भावूक.

नुकत्याच चित्रीत झालेल्या सारेगमप भागाच्या चित्रीकरणादरम्यान प्रशांत दामले यांनी पंडित वसंतराव देशपांडे यांचे ‘अष्टविनायक’ या चित्रपटातील दाटून कंठ येतो’ हे गाजलेले गीत सादर केले आणि परीक्षक वंदना गुप्ते, अवधूत गुप्ते, कार्यक्रमातील अन्य स्पर्धक कलावंतांबरोबरच उपस्थित प्रेक्षकांनाही अश्रू आवरेनासे झाले आणि सारेगमपचा मंच ह्ळवा, भावूक झाला.

प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले रसिकांच्या चेहर्‍यावर हसू फुलवण्यासाठी प्रख्यात आहेत. मात्र ‘आयडिया सारेगमप’च्या सेटवर प्रशांत दामलेंमधील वत्सल पित्याचे दर्शनही सर्वांना घडले. या गाण्याविषयी बोलताना आपली लेकही आता सासरी जाणार असल्याने ही गाण्यातील भावोत्कटता सध्या आपण कशा अनुभवतो आहोत ते सांगताना प्रशांत दामले यांना भावना अनावर झाल्या. तर त्यांची कन्या चंदना हिने बाबांबरोबरचे नाते कसे मित्राचे आहे आणि सासरी जाताना ती बाबाला स्वतःबरोबर नेणार आहे आणि त्यांनी तसा करार केलाय हे सांगताना तिला अश्रू आवरले नाहीत. बापलेकीचे हे नाते सारेगमपचा अवघा मंच हळवा करुन गेले.
Sa Re Ga Ma Pa
click here to read more

Advertisements

Leave a comment

Filed under Marathi Television Updates

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s