‘संस्कृती कला दर्पण’ – १२ व्या चित्रपट महोत्सवाची पर्वणी

‘संस्कृती कला दर्पण’ या संस्थे तर्फे रविंद्र नाटय मंदिर, प्रभादेवी येथे दि १३ फेब्रु ते १७ फेब्रु दरम्यान भव्य चित्रपट महोत्सवाची पर्वणी रसिकांना अनुभवण्यास मिळणार आहे.

या चित्रपट महोत्सवात तब्बल ५६ मराठी चित्रपटातून १७ उत्तम चित्रपटाची निवड करण्यात आली. या १७ चित्रपटामध्ये ‘शाळा’, ‘गजर’ , ‘रे ला रे’ , ‘डँबिस’, ‘खेळ मांडला’ , ‘अर्जुन’, ‘आम्ही का तिसरे’ , ‘फक्त लढ म्हणा’, ‘आरोही’ , ‘सोपान एक जिदद’ , ‘मुक्ती’ , ‘बालगंधर्व’ , ‘झकास’ , ‘यदा यदा ही धर्मस्य’ , ‘नऊ सव्वा नऊची वेळ होती’, ‘देऊळ’ या चित्रपटांबरोबर ‘आजच्या चित्रपटावरील जाहिरात आणि प्रमोशन’ व ‘आधुनिक तंत्रज्ञान आणि चित्रपट’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे.

‘शाळा’ चित्रपटापासून सुरु झालेल्या महोत्सवाची सांगता ‘देऊळ’ या चित्रपटाने होणार आहे. या स्पर्धेत वरील १७ चित्रपटाचे परीक्षण करून सर्वोत्कृष्ट तीन चित्रपट निवडले जाणार असून निवडलेल्या तीन सर्वोत्कृष्ट चित्रपटांना प्रथम पारितोषिक रुपये २ लाख, द्वीतीय दीड लाख आणि तृतीय एक लाख रुपयाचे पारितोषिक हे या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले आहे.

Sanskruti Kala Darpan
click here to read more

Leave a comment

Filed under News

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s