‘टूरिंग टॉकीज’ च्या संस्कृतीला लागलेली उतरती कळा दर्शविणारा चित्रपट | Movie Review Of Touring Talkies

खेडेगावात जत्रा भरणाऱ्या ठिकाणी तंबूत सिनेमाचे खेळ लावून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या ‘टूरिंग टॉकीज‘ संस्कृतीला लागलेली उतरती कळा दर्शविणारा हा चित्रपट चांदी नावाची वयात आलेली मुलगी, स्वत:चा छोटा भाऊ आणि जुगारी, दारुडा बाप अशा कुटुंबाची जबाबदारी, मुलाचा वेष परिधान करून टूरिंग टॉकीजचा, बापाचा व्यवसाय सांभाळत अडथळ्यांची शर्यत कशी पार करते त्याचा हा मागोवा.

निव्वळ मनोरंजनाच्या अपेक्षेने आलेल्या ग्रामीण प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या तरच तिकीट विक्री भरपूर होऊन पोट भरेल, कर्ज फिटेल हे जाणून मार्केटिंगचे सर्व प्रकार दोन भावंडे चलाखीने हाताळतात. बापाने जुगारात हरल्यावर गहाण टाकलेला तंबू परत मिळविण्याकरता दोघे भावंडे या व्यवसायातल्या राजकारणाला फसवणाऱ्या विरोधकांना कसे तोंड देतात हे प्रभावी पणे मांडण्यात नवनवीन प्रयोग करणारेलेखक दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यशस्वी झाले आहेत. या जुन्या व्यवसायातली बिकट परिस्थिती धडपड वास्तवता त्या मागचा इतिहास जाणून घ्यावा असाच आहे.

Touring Talkies, Trupti BHoir १९३७ ते १९५५ च्या काळात जोमात चालणारा हा व्यवसाय टिकवण्यासाठी आज जीवाचं रान करावं लागतं. तिथे आर्ट फिल्म घेऊन डायरेक्टर चित्रपट दाखविण्याच्या इच्छेने आल्यावर त्याच्या चित्रपटाचं स्वरूप प्रेक्षकांच्या मागणीनुसार बदलण्यासाठी त्याचा ग्रामीण मेकओव्हर करावाच लागतो. त्यासाठी ‘शाई होते शुभ्र ‘ हे साहित्यक नांव बदलून आकर्षक डबल मिनींगचे नामकरण करून गर्दी खेचावी लागते. एकूण काय प्रेक्षकांच्या अभिरुचिचा दर्जा कसा घसरलाय आणि त्यासाठी तंबू मालकाला किती तडजोड करावी लागते. चित्रपट मालकाला नीतीमूल्य कशी सोडावी लागतात हे दाखवण्याचा एक प्रयत्न…. पुढे वाचा 
Advertisements

Leave a comment

Filed under Movies Updates

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s